Akshay Raskar https://akshayraskar.com Akshay Raskar Fri, 27 Sep 2024 08:24:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. गोपाळराव पाटील यांना यंदाचा ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर https://akshayraskar.com/marathwada-bhushan-purskar-2024/ https://akshayraskar.com/marathwada-bhushan-purskar-2024/#respond Fri, 27 Sep 2024 08:20:00 +0000 https://akshayraskar.com/?p=5495 रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात पुरस्कारांचे वितरण, गणेश चंदनशिवे, बाळासाहेब गित्ते, अक्षय रासकर यांना मराठवाडा रत्न

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘मराठवाडा भूषण पुरस्कारा’साठी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे एमआयटी संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड आणि लातूर येथील छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. गोपाळराव पाटील यांना जाहीर झाला आहे.
लोककलेचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, बीड जिल्ह्यातील तालुका गेवराई, कोळगाव या गावची ब्लॉगरचे गाव म्हणून ओळख निर्माण करणारे श्री. अक्षय रासकर आणि धाराशिव कळंब येथील मराठवाडा ऍग्रो शेतकरी कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागात डेरी उद्योग उभा करणारे बाळासाहेब गित्ते या कर्तृत्ववान भूमिपुत्रांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राची लोकपरंपरा हा कार्यक्रम उपस्थितांना पर्वणी ठरणार आहे.

मराठवाडा जनविकास परिषद ही संस्था मराठवाडावाशियांसाठी गेली १६ वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठवाडा मुक्तीदिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात असतो. या सोहळ्यात समाजासाठी आयुष्यभर बहुमूल्य योगदान देणाऱ्या मराठवाड्यातील कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांना मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा भूषण तसेच विशेष कामगिरी करणाऱ्यांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा मराठवाडा भूषण पुरस्कारासाठी मराठवाड्यातील दोन दिग्गज आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी मराठवाडा भूषण पुरस्कार कोविडचे संकट निवारण्यासाठी उल्लेख काम करणारे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

]]>
https://akshayraskar.com/marathwada-bhushan-purskar-2024/feed/ 0 5495